Subscribe Us

भाषिक खेळ-४६

 


उखाणे

उद्देश: उखाण्यांची माहिती होणे व विचारशक्तीस चालना मिळणे.
सूचना :खाली दिलेल्या उखाण्यांची उत्तरे शोधा.प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि सोडवायला वेळ एक मिनिट.पाहू कोण सर्वात अगोदर ओळखतील सर्व उखाणे.

४६) जन्मापासून तुम्हाला मिळाले,
तुमच्यापेक्षा इतरानिच वापरले.

४७) आधी गोल गोल मग खोल खोल 
मग थय्यक थय्यक ! 

४८) रात्रभर फिरायला जाय 
दिवसा खाली डोके वर पाय 

४९) पृथ्वीभोवती फिरतो चंद्र नव्हे 
पावसाच भविष्य सांगतो पण ज्योतिष्य नाही.

५०) एका बाटलीत दोन रंग 
फुटलीकी सगळेच दंग 

५१) हा कोरडा गेला कि सगळ्यांचे 
डोळे गळू लागतात.

५२) खजिन्याला एका ना कुलूप ना कडी 
कितीही धन लुटा ,वाढे घडीघडी.

उत्तरे-४६)नाव ४७) खलबत्ता ४८) वटवाघुळ ४९)उपग्रह 
५०) अंडे ५०)पावसाळा ५१) ज्ञान ५२)मच्छरदाणी

Post a Comment

0 Comments