उद्देश : संकेता वरून शब्द शोधता येणे.
सूचना : खाली काही कोडी दिलेली आहेत. यात शब्दांच्या जोड्या मधून योग्य अक्षरे निवडून लपलेला शब्द शोधायचा आहे शेवटच्या ओळीत अर्थाचा संकेत दिलेला आहे. हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल .
वेळ : कोड्यास दोन मिनिटे
१) चंद्रात आहे पण शशित नाही.
दशेत आहे पण हालात नाही.
नदीत आहे पण सरीतेत नाही.
थंडगार तृप्ती माझ्याविण नाही.
२) परातीत आहे पण ताटात नाही.
लंबकात आहे पण लांबीत नाही.
गडूत आहे पण लोटीत नाही.
मी असल्यावर झोपेचा आनंद काय सांगू ?
३) चटणीत आहे पण तिखटात नाही.
मेळ्यात आहे पण समूहात नाही.
लीनतेत आहे पण नम्र्तेत नाही.
मी एक सुवासिक फूल आहे.
४) वाळूत नाही पण रेतीत आहे.
कीटकात नाही पण माशीत आहे.
माहितीत नाही पण मजकुरात आहे.
तलम ,मऊ,सुरळीत ,मी कोण ?
५) यात्रेत नाही पण जत्रेत आहे.
आभाळात नाही पण नभात आहे.
अज्ञानीत नाही पण ज्ञानीत आहे.
सर्वांमध्ये वंदनीय अशी ही आहे .
उत्तरे-१)चंदन २) पलंग ३) चमेली ४) रेशीम ५)
0 Comments