Subscribe Us

भाषिक खेळ-५३

 

उद्देश : संकेता वरून शब्द शोधता येणे.

सूचना : खाली काही कोडी दिलेली आहेत. यात शब्दांच्या जोड्या मधून योग्य अक्षरे निवडून लपलेला शब्द शोधायचा आहे शेवटच्या ओळीत अर्थाचा संकेत दिलेला आहे. हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल .

वेळ : कोड्यास दोन मिनिटे


१)  फुलात नाही पण सुमनात आहे.

 वनीतेत नाही पण रमणीत आहे.

 देवात नाही पण ईश्वरात आहे.

 उन्हाळ्यात मी अवश्य लागणार आहे.


 २) नामस्मरणात आहे पण नमस्कारात नाही.

 रजेत आहे पण सुट्टीत नाही. 

बाळ मध्ये आहे पण मुलात नाही. 

देवाची करणी म्हणून तर मी आहे. 


 ३) भिंगरीत आहे पण भिरभिऱ्यात नाही. 

तलवारीत आहे पण समशेरीत नाही.

 माझ्या शिवाय घर तर शक्यच नाही .


४) मापात नाही पण वजनात नाही.

 फुलात नाही पण सुमनात आहे.

 प्रवाहात नाही पण धारेत आहे.

 मी नसेल तर कुणाला अस्तित्वच नाही.


 ५) उकारात नाही पण आकारात आहे.

 वस्त्रात नाही पण कापडात आहे.

 अक्षरात नाही पण शब्दात आहे.

 याला कुठे कुठे म्हणून ठिगळ लावणार ?


उत्तरे-१) सूरई २) नारळ ३) भिंत ४) वसुधा ५) आकाश


Post a Comment

0 Comments