Subscribe Us

भाषिक खेळ-३६

 

कुलुप किल्ली

 उद्देश : दिलेल्या जोड शब्दांच्या विरुद्धार्थी जोड शब्दांची ओळख होणे.

 सूचना : हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल .

वेळ : दहा मिनिटे


 खाली गटात काही जोड शब्द म्हणजे कुलुपे दिलेले आहेत असे समजा गटात त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द म्हणजे किल्ल्या दिल्या आहेत यावरून गटातील त्यांना योग्य त्या किल्ल्यात शोधा दिलेल्या वेळेत जास्त उत्तरे बरोबर लिहिल तो जिंकेल.

 खेळ क्रमांक : १

 उदाहरणार्थ : लुळापांगळा - धडधाकट

अ ब

१) गुळगुळीत सटीसामाशी

२) काटकसर वेडावाकडा

३) वाईटसाईट ठेंगणाठुसका

४) रमत-गमत चांगलाचुंगला

५) सदासर्वदा गोरापान

६) सरळसोट घाईघाईने

७) दिनदुबळा पांढराशुभ्र

८) काळासावळा उधळमाधळ

९) उंचापुरा धष्टपुष्ट

१०) काळा कुळकुळीत खडबडीत






Post a Comment

0 Comments