“ना शहाण्याचे ना मूर्खाचे ,हे जग आहे तरी कुणाचे ?“
मराठी मधील एक गाजलेली म्हण आहे “अति शहाणा त्याचा बैल रिकामा “जवळपास अती शहाण्या माणसांसाठी तंतोतंत लागू पडते. याचे कारण असे की शहाण्या माणसात एवढा अहंकार असतो ,की तो इतरांना एकदम कचरा समजायला लागतो.तो स्वतःला समजतो की, माझ्यापुढे कोणी टिपू शकत नाही .या भ्रमात जीवन जगत असतो.मात्र स्वतःच्या जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही .उदाहरणार्थ एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते.
एक अति शहाणा आणि खूप शिकलेला व्यक्ती त्याला समुद्र पार करून जायचे असते.म्हणून लहानसे नाव भाड्याने करतो व आणि समुद्राचा प्रवास चालू होतो. नावेत नावाडी आणि ती व्यक्ती हे दोघेच जण असतात. अचानक शहाणा व्यक्ती त्या नावाडीला एक प्रश्न विचारतो ,तुम्हाला मराठी ,इंग्रजी व्याकरण वगैरे काही येते का ? नावाडी म्हणतो ,इंग्रजी ,व्याकरण वगैरे काही येत नाही, परंतु मराठी बोलता येते. आणि बोललेले मला समजते .तो शहाणा व्यक्ती म्हणाला एवढी सोपी गोष्ट येत नाही तुम्हाला ? अहो तुमचं २५% जीवन वाया गेले ! नानाडी बिचारा मनातल्या मनात बोलला ,माझ्या नावेत बसून माझे जीवन वाया घालवतो. पुन्हा थोडे पुढे गेल्यावर आणखी एक प्रश्न विचारतो ,का हो तुम्हाला गणित-भूमिती वगैरे काही येते का ? नावाडी बोलला काही जमत नाही बुवा .पण 2+2=4 होतात. एवढं तेवढं कामापुरता येते .पुन्हा तो शहाणा माणूस म्हणतो एवढसं सोपं येत नाही तुम्हाला ? काय जीवन आहे म्हणे तुमचं ! 50 टक्के जीवन वाया गेलं .
नावाडी बिचारा त्याच्या तोंडाकडे पाहत बसला .
मनात म्हटलं फालतू बसवलं
या माणसाला. नाव पुन्हा थोडी पुढे
गेल्यावर आणखी एक प्रश्न विचारतो ! का हो तुम्हाला भूगोल ,इतिहास ,विज्ञान ,परिसर
अभ्यास यातलं काही जमतं का ? नावाडी म्हणे नाही बुवा ,एवढं तर काही जमत नाही, आणि
माहित नाही , पण वारा सुटला ,आकाशात काळे ढग आले ,वातावरणामध्ये बदल झाला ,एक असा
अंदाज मात्र येतो की, आता पाऊस येणार आहे .यावर तो अतिशहाणा व्यक्ती म्हणतो एवढं
सोपं नाही येत तुम्हाला ? काय जीवन आहे तुमचं म्हणे ! आत्ता म्हणे तुमचं 75 टक्के जीवन वाया गेलं .असे म्हणताच नावाडी बिचारा निराश झाला.त्या व्यक्तीपुढे हतबल
झाला. मनातल्या मनात म्हटले विनाकारण या व्यक्तीला नावेत बसविले .थोड्यावेळाने
जोरात वादळ सुटायला सुरुवात झाली .,विजा चमकू लागल्या, समुद्रातील पाण्याच्या लाटा
जोरात उसळू लागल्या ,नाव खालीवर व्हायला लागली ,विजा चमकायला
लागल्या .एवढ्यात नावादिने त्या व्यक्तीला
एक प्रश्न विचारला !काहो तुम्हाला पाण्यात पोहता येते का ? त्यावर तो शहाणा
व्यक्ती बोलला ,मला पोहता येत नाही. यावर तो नावाडी
म्हणाला एवढं सोपं नाही येत तुम्हाला ? काय
जीवन आहे तुमचं ? आता म्हणे 100% जीवन वाया गेलं तुमचं .आता
नाव उलटते म्हणे पाण्यात. बुडणार आहे हे, मी पाण्यात पोऊन निघून जातो.आणि तुम्ही मरा म्हणे पाण्यात.
याच प्रमाणे शहाण्या माणसाचे हाल होत असताना
तुम्ही-आम्ही सर्वांनी पाहिलेले आहे .अतिशहाणा व्यक्ती कोणाचेही म्हणणे सहजासहजी
ऐकायला तयार नसतो .शहाणा व्यक्ती आपल्यात दिमाखात वावरत असतो. त्यांच्या अंगी
अहंकार असल्यामुळे स्वतःच्या आयुष्यात
यशस्वी कधीच होत नाही आणि त्याचे हे जग होऊ शकत नाही .अशा शहाण्या माणसाची ओळख
झाली तर त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाते. आणि ते त्यांना कधीच भिक घालत
नाहीत.आणि विशेष म्हणजे अशा व्यक्तीशी बोलण्याची सुद्धा लोक टाळत असतात .याच
प्रमाणे हे जग मूर्ख व्यक्तीचा सुद्धा होत
नाही, या जगात यशस्वीपणे जीवन जगू शकत नाही .उदाहरण द्यायचे झाल्यास आपणा सर्वांना
टोपीवाल्याची गोष्ट माहीतच असेल ,तरी पण
आठवण करून द्यावीशी वाटते .हि गोष्ट काळजीपूर्वक वाचल्यास गोष्टीचा आशय कळेल.
एकदा टोपीवाला टोप्यांचे गाठोडे
बांधून टोप्या विकण्यासाठी दुरच्या बाजाराला जात असताना मध्येच विसावा घ्यावा
म्हणून एका आंब्याच्या झाडाखाली गाठोडे बाजूला ठेवून झोपी जातो. एवढ्यात त्या
झाडावरील माकडे खाली उतरून गाठोड्यातल्या टोप्या घेऊन जातात आणि झाडावर गोंधळ घालत इकडून तिकडे
उड्या मारतात .माकडांच्या गोंधळामुळे टोपीवाल्याला जाग येते. बघतो तर काय गाठोड्यात
एकही टोपी नसते . झाडावर
पाहिल्यानंतर माकडांनी सर्व टोप्या आपल्या डोक्यात घातलेल्या दिसतात .टोपीवाला विचारात
पडतो .त्याला काही सुचेनासे झाले .एवढ्यात टोपीवाल्याने दगड-धोंडे माकडावर भिरकावले. माकडानाही ही झाडावरील कैऱ्या झाडांच्या ,फांद्या सोडून
टोपीवाल्या वर फेकल्या .काही केल्या माकडांनी टोप्या फेकल्या नाही .शेवटी त्यांना
एक युक्ती सुचली ,त्याने आपल्या डोक्यातून टोपी झटकन काढून जमिनीवर फेकली .त्याच
प्रमाणे माकडानेही आपापल्या डोक्यातील टोप्या काढून पटापट खाली फेकल्या .टोपीवाल्याने
सर्व टोप्या जमा करून बाजारात विकायला निघून गेला .आता झाली ही जुनी गोष्ट .
परंतु आता हीच गोष्ट पुढे
लांबली आहे .काही दिवसांनी टोपीवाला मरण पावल्यानंतर त्याचा मुलगा सुद्धा सोपी
विकण्याचा व्यवसाय करू लागला .तोही दूरच्या बाजाराला टोप्या विकण्यासाठी जातो .त्याच्या
वडिलांना सारखा प्रसंग त्या मुलावर येतो. मुलाला वडिलांवर आलेला प्रसंग आठवतो .वडिलांनी
ज्याप्रमाणे माकडांशी सामना केला मुलांनीही माकडाशी सामना केला .परंतु नव्या जगात
नवी युक्ती लढवली नाही .की नवीन काही शिकला नाही. आणि शेवटी मुलानेही वडीला
प्रमाणे डोक्यातील टोपी काढून फेकली. मुलाला वाटले माकडे ही पटापट टोप्या काढून
फेकतील परंतु तसे झाले नाही .परंतु पटकन
एक माकड खाली उतरला आणि मुलाने फेकलेली टोपी सुद्धा उचलून घेऊन गेला .मुलगा बिच्चारा
! पाहतच बसला.
याचा अर्थ असा की या जगात जीवन जगत असताना नवे काही शिकलास नाही .म्हणून फसला मित्रहो अशा गोष्टी सर्वांच्याच बाबतीत घडत नाही. हे एक उदाहरण आहे .तरीही ही नव्या जगात वावरत असताना जगत असताना ,मात्र गाफील राहूनही चालत नाही .नक्कीच या वरील दोन्ही उदाहरणावरून आपल्या लक्षात आलेच असेल की ,एवढ्या सहजतेने या जगात जीवन जगता येणे कठीण आहे .शहाण्या माणसाची फजिती कशी झाली आणि गाफील माणूस कशाप्रकारे बनतो यावरून लक्षात येईल .म्हणून म्हणतो की “ हे जग ना शहाण्या चे ना मूर्खाचे “ मग हे जग आहे तरी कुणाचे. याप्रमाणे एक प्रकारचे कोडे आपल्या मनात सुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही .मग हे जग आहे कुणाचे ? आपणही संभ्रमात पडलास काय? मित्रहो हे जग आहे चतुर माणसाचे . हुशार माणसांचे . चतुर व्यक्ती असल्या भानगडीत पडत नाही .कोणतेही संकट जरी आले, तरीही त्यावर मात करतो .संकटातून बाहेर पडतो .त्यातून मार्ग काढतो .वेळ प्रसंग पाहून आपली युक्ती लढवतो. सहजासहजी कोणाच्याही जाळ्यात सापडत नाही. त्याचा गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोण इतरांपेक्षा वेगळा असतो .चतुर व्यक्ती शहाण्या माणसाला ही चालवतो व मूर्खनाही चालवतो .हे जग त्या चतुर माणसाचे आहे. चतुर माणूस या जगात यशस्वीपणे जीवन जगतो.चतुर माणुस कधीच घाबरत नसतो . त्यांच्या अंगी हिम्मत असते, तो इतरांना हिम्मत देत असतो. सरळ सरळ संकटात न घाबरता मार्ग काढणारा त्यांचे हे जग आहे .आतापर्यंत जे आपल्या जीवनात यशस्वी झाले आहेत अशा सर्व मान्यवरांना सर्वांना
मानाचा मुजरा. !
प्रेमचंद राठोड
मो.नं -९४२०१५०६७२
0 Comments