याशोगाथा माझ्या शाळेची
ISO मानांकित जि.प.मराठी उच्च प्राथमिक शाळा ,नारखेड केंद्र –निमगाव पं.नांदुरा
जि.बुलडाणा
उपक्रम राबवण्यापूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती थोडी कमी होती .परंतु 1)“ मी इंग्रजी बोलू लागलो” या उपक्रमांतर्गत आम्ही ठरवले की,दररोज सायंकाळी शेवटच्या तासिकेत सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात वर्गनिहाय बसवून अगदी पहिल्या वर्गापासून इंग्रजी बोलण्याची संधी दिली.तेही सर्व विद्यार्थ्यांपुढे त्यामुळे त्यांच्यात हळूहळू आत्मविश्वास वाढायला लागला.त्यात लहान लहान संवाद ,लहान लहान वाक्य,शब्द म्हणायला लावले.या गोष्टीचा प्रभाव सर्व विद्यार्थ्यावर पडायला लागला.आणि बघता बघता शाळेतील जवळपास विद्यार्थी एकमेकांशी इंग्रजीतून संवाद साधायला लागली.या सारखे अनेक उपक्रम आम्ही सर्व शिक्षक मिळून आमच्या शाळेमध्ये सतत राबवत असतो.त्यामुळे आता वर्गातील उपस्थिती सुद्धा शंभर टक्के वाढली आहे.
विद्यार्थ्यांना आम्ही ही गोष्ट पटवून दिली कि,माणसाच्या
मुलभूत गरजा म्हणजे अन्न ,वस्त्र ,निवारा
ह्या गरजा जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढीच गरज शाळेची ,शिक्षणाची आहे.कारण शिक्षण
अशी कला आहे कि,माणूस शिक्षणामुळेच घडतो.शिक्षणामुळेच त्याला जगातील गोष्टी कळतात.शिक्षणामुळेच विचार करण्याची कला
सुद्धा माणसाला प्राप्त होते.शिक्षण जर नसेल तर,मनुष्य डोळे असून आंधळ्यासारखा
असतो.शिक्षण जर नसेल तर मानव व पशू यात फारसा फरक उरत नही.म्हणून शिक्षण ही अशी इ
कला आहे जि माणसाला जीवन जगण्याचे शिकवते.
आमची जि.प.मराठी उच्च प्राथमिक शाळा नारखेड .या गावात जवळपास ७०% आदिवाशी लोकांची वस्ती आहे.त्यामुळे शिक्षणाची फारशी आवड नव्हती ,आणि तेथील लोकांची घरची परिस्थिती हलाकीची त्यामुळे मोलमजुरी करणे,पोटांसाठी कोणाच्या तरी कामाला गेल्याशिवाय संध्याकाळची चूल पेटणे अशक्य.त्यातच लहान भावडांना सांभाळण्यासाठी आईबाबा सोबत शाळेला दांडी मारल्याशिवाय गत्यंतर नसायचे .आणि ह्या गोष्टी लक्षात आल्यावर मुख्याध्यापक श्री.स.तू.क्षीरसागर व सर्व शिक्षक मिळून यांनी विचार केला यावर उपाय योजना केल्याशिवाय शाळेची उपस्तीती वाढणार नाही.म्हणून शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरविले.”सुंदर हस्ताक्षर स्पर्धा “ मी इंग्रजी बोलू लागलो “हे उपक्रम इयत्ता १ ली ते
आठवीसाठी घेण्यात आले.सायंकाळी शेवटच्या तासिकेत आठवड्यातून दोन दिवस विद्यार्थ्यांना हस्तारांविषयी शाळेतीलच शिक्षक श्री प्रेमचंद राठोड यांनी मार्गदर्शन केले.उपक्रमाचा कालावधी तीन महिन्यासाठी
होता.त्यामुळे अक्षरशः इयत्ता १ ली पासूनचे विद्याथी सुंदर हस्ताक्षर गिरवायला लागले.आणि शेवटी प्रत्येक वर्गाची
स्पर्धा घेवून सर्वात चांगल्या तीन क्रमांकांना पेन ,वही स्वरुपात भेट देण्यात आली.त्याच
प्रमाणे दैनदिन परिपाठात जी तारीख तो पाढा ,परिपाठ मंडळ,दररोज पाच इंग्रजी
शब्दांचे पाठांतर,व नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र यातील दररोज परिपाठात एका
प्रयोगाविषयी माहिती श्री अमोल नारखेडे सर देतात .एकही विध्यार्थी शाळा बाह्य नाही.हे
सर्व उपक्रम राबवीत असताना मु.अ.स.तु.क्षीरसागर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन
मिळत असते.
दररोजच्या अध्ययन अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाच्या
माध्यमातून तंत्रज्ञान विषयी आवड निर्माण होऊन दीक्षा application वरील शैक्षणिक
व्हिडीओ व तंत्रस्नेही शिक्षक श्री प्रेमचंद राठोड यांनी तयार केलेल्या ५५०
शैक्षणिक व्हिडीओच्या माध्यमातून सुद्धा दैनदिनी अध्ययन-अध्यापन प्रभावीपणे राबवून
निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा झाला.शाळेत संगणक कक्ष स्वतंत्र असून १० संगणक व
तीन lcd च्या माध्यमातून दैनदिन अध्ययन अध्यापनामध्ये अमोल नारखेडे सर व शंकर
सोनटक्के सर माहिती देतात.त्यामुळे ह्या सर्व उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण
विषयी गोडी आणि जीज्ञाषा निर्माण होऊन उपस्तीती मध्ये भार प
प्रभावीपणे वापर चालतो.
शासनाकडून वेळोवेळी देण्यात
येणारे शिक्षकाना शैक्षणिक प्रशिक्षणाचा फायदा पुरेपूर विद्यार्थ्याना देण्यात
येतो.प्रशिक्षणातील नवनवीन बाबींचा समावेश दैनदिन अध्यापनामध्ये केल्या जातो.
शाळेतील विध्यार्थ्यांचे वीर भगतसिंग स्काऊट गाईड
पथक तयार केले असून श्री.रवींद्र आखरे सर
यांच्या मार्गदर्शनखाली शाळेची शिस्त व देखभाल व सुरक्षितता त्याच प्रमाणे
राष्ट्रीयसणाला पथसंचलन व कवायती साठी सज्ज असतात.
शाळेतील उपस्थिती वाढीसाठी व ती टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक –पालकसंघ ,माता –पालकसंघ शाळा व्यवस्थापन समिती व गावातील नागरिकांकडून भरपूर सहकार्य मिळते.त्याचप्रमाणे शाळेतील भौतिक सुविधांसाठी सर्वांचे वेळोवेळी सहकार्य मिळते.शाळा व गावं यांचे संबध स्नेहाचे व आपुलकीचे असल्यामुळे सर्वच स्तरात विद्यार्थ्यांची प्रगती साधण्यास मदत होते.तसेच नवोदय परीक्षा ,शिष्यवृत्ती ,NTS,NMMS,MTS,चित्रकलाविषयक परीक्षेत नेहमीच आमच्या शाळेतील विध्यार्थ्यांचा समावेश असतोच.केवळ सहभाग असतोच असे नाही तर घवघवीत यश सुद्धा संपादित करत असतात.नुकत्याच झालेल्या NMMS परीक्षेत तालुक्यातून आमच्या शाळेतील चार विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत. त्यातून अनु.जमती मधून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान एका विद्यार्थ्याला मिळाला व obc संवर्गातून दुसरा येण्याचा मान मिळाला आहे.मुख्याध्यापक श्री.स.तू.क्षीरसागर सर यांच्या प्रेरणेमुळे व श्री.अमोल नारखेडे सर यांच्या मार्गदर्शणामुळे यश संपादन केले आहे.त्याच प्रमाणे विध्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळायला हवा त्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे विविध गुणदर्शक कार्यक्रमांचे आयीजन केल्या जाते.
तसेच शारीरिकदृष्ट्या मजबूत राहण्यसाठी विविध खेळाचे आयोजन करून केंद्रस्तर ,तालुकास्तरीय,व जील्ह्यस्तरावर सुद्धा सहभाग घेतल्या जातो.त्यातून अनेक बक्षीसे सुद्धा मिळालेली आहे.तसेच दरवषी वेगवेगळ्या ठिकाणी इतिहासाची व भूगोलविषयी माहिती व्हावी या दृष्टीकोनातून शैक्षणिक सहलीचे आयोजन केल्याजात असून त्यासाठी शाळेतील श्री सुरेश बहुरूपे ,देविदास अंभोरे ,रामदास कवळे,गजानन तायडे ,सौ .सविता पाऊलझगडे व सौ.ज्योती सोळंके यांचा मोलाचा सहभाग असतो.
कला ,कार्यानुभव
व शारीरिक शिक्षण या विषयाला अनुसरून विविध आयोजन व प्रदर्शनी भरवून
विध्यार्थ्यांना प्रोस्ताहित केल्या जातात.मैदानी विविध खेळाचे आयोजन ,केल्या
जाते.त्याच प्रमाणे चित्रकलाविषयक मार्गदर्शन ,स्पर्धेचे आयोजन सुद्धा केल्या
जातो.रांगोळी स्पर्धा ,चित्रकला सपर्धा ,हस्ताक्षर स्पर्धा ,निबंध लेखन स्पर्धा ,वक्तृत्व
स्पर्धा ,विविध साहित्य प्रदर्शनी यांचे सुद्धा आयोजन केल्या जाते यासाठी सर्व
शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभते.
३) माझी ओळ,तुझी ओळ--- ---हा उपक्रम राबविताना पूर्व
प्राथमिक स्तरापासूनच गाणी गोष्टी मूल ऐकत असतो.आणि त्या गाणी गोष्टी ऐकता ऐकता
प्रत्यक्षातील एखांद्या संबधीची हकीकत नाही हे समजून घेत असते.प्राथमिक स्तरातील
गद्य पद्य पाठामधून त्याला बळकटी येत असते.
एकदा
असेच भाषेचे अध्यापन करताना एक उपक्रम सुचला,आणि लगेच तो आमलात आणायचा ठरला.विद्यार्थ्यांना
बघा तुम्हाला एक गम्मत संगाणार आहे.गम्मत म्हणता बरोबर विद्यार्थ्याना उत्सुकता
निर्माण झाली.मुलाना म्हणालो” माझी एक ओळ आणि तुमची एक ओळ “ असं सांगता बरोबर मुले
गोंधळात पडली.म्हणजे कसं सर.मुले लगेच
बोलली.मुलांना म्हणालो मी एक ओळ म्हणेन,त्याला जोडून तुम्ही एक एक ओळ जोडायची.मुलांची
संकल्पना स्पष्ट झाली.आणि मग काय गंमत एक सुंदर कविता जन्माला आली.मी म्हटले “
झरझर झरझर पाऊस आला.लगेच एका विद्यार्थ्याने दुसरी ओळ म्हटली.” नदी नाल्यांना पूर
आला.
मातीला ही गंध सुटला
पशुपक्ष्यांना
आनंद झाला
तहानलेले वृक्ष सोयरे
वाहू
लागले गार वारे
ओल्या पावसानी ओले झाले
क्षणात सारे न्हाऊन गेले
मी म्हटले छान ओळी जोडल्या मुलानो.बघा किती
सुंदर कविता तयार झाली.मुलांनीही कवितेतून पावसांचा आनंद घेतला.मुलांना सुद्धा आता
कविता लिहावी वाटू लागली.हा उपक्रम मग वर्गात नित्य नियमाने चालू ठेवला.त्यामुळे
मुलांचे लेखन कौश्यल वाढीस लागले.चिंतन सुद्धा वाढले.आणि मग हा उपक्रम शाळेतील इतर
वर्गानी सुद्धा राबवणे चालू केले.त्यामुळे एक कवितेचेच पुस्तक तयार झाले.त्या
पुस्तकाचे प्रकाशन वार्षिक स्नेहसंमेलनात मान्यवराच्या हस्ते करून मुलांचा आनंद
द्विगुणीत केला
४) मुले जेंव्हा वाचू लागली.-
माझ्याकडे जेंव्हा इयता पहिलीचा वर्ग होता तेंव्हा
त्याना नेमकं कस सिकवाव हेच कळेना.माझ्या डोक्यात एक कल्पना आली.आणि मी लगेच
youtube वरील छानछान गोष्टी मुलांना दाखवू लागलो.तेन्हां मुलाना एवढा आणंद झाला कि
मुले एकदम खुश झाली.त्याना आगोदर शिकण्याची व शाळेत नियमित येण्याची आवड निर्माण
केली.
मुलांना मी दररोज youtube
वरील वेगवेगळ्या गंमती जंमती सुद्धा दाखवायचो.आणि हळू हळू वाचनाकडे वळवले.शब्दांचे
व्हिडीओ दाखवणे सुरु केले.इतर शिक्षक बांधवांनी तयार केलेलं व्हिडीओ मी दररोज
त्याना दाखवून वाचन व लेखन सुद्धा घेत होतो.
एक दिवस मनात आले कि
मी का तयार करू शकत नाही व्हिडीओ ? माझे मन मला दररोज सतावत होते.एक दिवस मराठीची
कविता कृतुयुक्त शिकवत असताना वाटले कि,अगोदर मुलांचाच व्हिडीओ तयार करावा.आणि काय
बघता बघता मुलांचा व्हिडीओ त्या केला.आणि तो मुलांना दाखवला.मुले तर एवढी खुश झाली
कि,एकापुढे एक येवून गर्दी करायला लागले.
आणि मग काय तेथून सुरु झाला प्रवास तंत्रस्नेही शिक्षकांचा.दररोज मी एक
किंवा दोन व्हिडीओ तयार करून मुलाना दाखवत होतो.मुलाना ओढ निर्माण होऊन मुले वाचू
लागली लिहू लागली.हळूहळू पाठ्य्पुस्कातील घटकनिहाय व्हिडीओ तयार करून अध्यापन
व्हायला लागले.नंतर एक youtube channel तयार करून त्यावर व्हिडीओ अपलोड करू लागलो.त्यामुळे
इतर शाळेतील मुलांना सुद्धा त्याचा भरपूर फायदा व्हायला लागला.फोन यायला लागले.सर
तुम्ही तयार केलेले व्हिडीओ आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा दाखवतो.
हे एकूण मला खूप आनंद
व्हायचा.आमच्या शाळेतील प्रत्येक वर्गातील शिक्षक बांधवाना मोबाईल मध्ये व्हिडीओ
देवून सर्व मुले व्हिडीओ पाहून शिकू लागली.led वर laptop वर व्हिडीओ दाखवून
मनोरंजनात्मक रित्या अधयन व अध्यापन होवू लागले.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या
गुणवत्तेत आपोआप वाढ होवू लागली.किमान ७०० व्हिडीओ आज रोजी तयार केलेलं असून एक
कोटीहून अधिक व्हिव व ३० हजार subscriber
आहेत.आणि त्यामुळे विद्यार्थी सुद्धा आपल्या पालकांच्या मोबाईल मध्ये घरी व्हिडीओ
पाहून अध्ययन करत असतात.या मुळे विद्यार्थ्यांच्या वाचनात व लेखनात गती निर्माण
झाल्याची आढळून आली.मुले न कंटाळता शाळेत नियमित येऊन त्यांच्या उपस्थितीत वाढ
झाली.
याचा फायदा राज्यातील अनेक शाळांना झाला आहे.आजही माझ्या youtube वरील
व्हिडीओ.काही शिक्षक बांधवांना pendrive मध्ये मोफत व्हिडीओ देवून आपल्या वर्गातील
व शाळेतील विद्याथ्यांना अध्ययनासाठी दिले आहे.
त्याच प्रमाणे mobile वरील २०
शैक्षणिक application playstoar वर अपलोड करून free उपलब्ध केलेले आहे.application
च्या माध्यमातून अनेक घटक त्यात समाविष्ट केलेले असून .त्याचाही फायदा राज्यातील
अनेक शिक्षकाना व विद्यार्थ्यांना झाला आहे.त्यात इयत्ता पहिली ते सहावी
पर्यंतच्या स्वत: गायलेल्या व संगीतबद्ध केलेल्या कविता mp3 स्वरुपात आहेत.विद्यार्थ्याना सहज व सोप्या
चालीत म्हणता याव्या अश्या आहेत.
५) मी एक छंद अनेक ---- या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखून पाल्यांच्या अंगी असलेल्या कलेंचे विशेष प्रशिक्षण पालकांनी दिल्यास यातूनच भावी कलाकार समाजाला मिळू शकतो .या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा बौद्धिक ,मानसिक,भावनिक सामाजिक,व शारीरिक विकास साधल्या जाऊ शकतो.या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमच्या शाळेत.एका महिन्याला एक उपक्रम .....
त्यात चित्रकला ,हस्तकला ,रांगोळी
कला,गायन,वादन ,सुंदर हस्ताक्षर काढणे ,अभिनय,कविता लेखन ,वक्तृत्व ,नृत्य कला ,उकृष्ट
वाचन कला या सारखे उपक्रम राबवून प्राथमिक वर्गापासून तर आठवी इयत्तेपर्यंत घेत
असतो.एका महिन्याला एक उपक्रम घेवून विद्यार्थ्यांकडून भरपूर सराव घेतल्या जातो.सरावाअंती
आपोआपच त्या उपक्रमा विषयी आवड निर्माण होऊन त्यातील सुप्त गुणाना चालना मिळते.
या उपक्रमातून विद्यार्थी
त्यांच्या मनातील भावना,कल्पना प्रत्यक्षात उतरवतात.व आपले विचार प्रकट करत
असतात.त्यांच्या सवत:च्या वागण्यातून त्यांच्या मनाची अवस्था प्रगट करतात.विद्यार्थी
वेगवेळ्या प्रकारच्या भावना आपल्या चित्राच्या रेखाटनातून उरवतात.टी शिक्षकाना
वाचता यायला हवी.त्यामुळे त्याला अधिक प्रोत्साहनव चालना मिळते.
कागदाच्या अनेक प्रकारच्या
वस्तू विद्यार्थी तयार करत असतात.त्यामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती
वाढविण्यास मदत होते.वेगवेगळ्या छंदामुळे रचनेची जान ,सौंदर्यदृष्टी,रंगाचे ज्ञान ,विविध
आकाराचे ज्ञान,सुसंगत मांडणी,चिकित्सकता व शोधक वृत्ती निर्माण होते.विद्यार्थ्यांमध्ये
अनेक प्रकारच्या कल्पकता दडलेल्या असतात.अश्या या उपक्रमाद्वारे त्याच्या सुप्त
गुणाना निश्चितच वाव मिळतो.वर्गातील उपस्थितीत व गुंवातेत वाढ होण्यास खूप मदत
होते.
आमची शाळा डिजिटल शाळा असून प्रत्येक मूल आनंदाने शिकण्यासाठी शाळेमध्ये आवडीने येतो.त्यासाठी शाळेच्या आवारात भरपूर झाडे ,फुलझाडे लावलेली असून नियमित रित्या त्याना वाढविण्यासाठी व संगोपनासाठी झाडे विध्यर्थ्याना दत्तक दिलेली आहे.त्यामुळे विध्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी स्नेहाची व आपुलकीची भावना निर्माण झालेली दिसून येते.सर्वात महत्वाची बाब म्हणजे दुपारचे शालेय पोषण आहारसाठी सुसज्ज असे हॉलअसून पंख्यासह व water filter सह स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे.
आमची शाळाआय.एस.ओ.मानांकन
प्राप्त शाळा असून शाळेची संपूर्ण wall कंपावुंडवर शैक्षणिक चित्रे व मजकुराने
रंगविलेले आहे.त्याच प्रमाणे प्रत्येक वर्ग खोलीच्या भिंती व दर्शनी भाग उकृष्टरित्या
रंगविलेले असून भिंती बोलक्या केलेल्या
आहेत. प्रत्येक शिक्षक कुशल व विध्यार्थ्याप्रती तळमळीने अध्यापनाचे कार्य
प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडण्यात कोणत्याच प्रकारची कसर ठेवत नाही.दिवसेंदिवस
शाळेची उतरोत्तर प्रगती होत असून पाहणारेही पाहतच राहतील.
शेवटी एकच सांगावेसे वाटते ..
मज आवडते ही मनापासुनी शाळा |
लाविते लळा ही जसा माउली बाळा | |
लेखक शिक्षक
प्रेमचंद देवसिंग राठोड
मो.नं.-९४२०१५०६७२
0 Comments