Subscribe Us

लेख-फेसबुक वापरताना काय काळजी घ्यावी

 

              फेसबुक वापरताना काय काळजी घ्यावी

                                         Facebook



१)आपला फेसबुक चा युजर व पासवर्ड कोणाशीही शेअर करून धोक्यात येवू नका.त्याचप्रमाणे तो आपल्या मोबाईलच्या नोटबुक मध्ये अथवा कोठेही लिहून ठेवू नका.आपली सेटिंग पब्लिक न करता आपल्या मित्रापुरती ती मर्यादित ठेवा.या साठी आपली वयक्तिक माहिती कोण-कोण पाहू शकेल याची व्यवस्थित सेटिंग करून घ्या.तसेच फेसबुकवर अनोळखी व्यक्तीकडून फ्रेंड्स रिक्वेस्ट स्वीकारू नका.किंवा त्यांना फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवू नका.महत्वाची बाब म्हणजे अनोळखी मित्रांसोबत आपली कसलीही वयक्तिक माहिती अथवा डाटा उघड करू नका.


२) फेसबुकवर खात्री नसणाऱ्या पोस्ट,बातम्या अथवा अन्य माहिती टाकण्याचा किंवा त्या फोरवर्ड करण्याचा मोह करू नका.यामध्ये बनावट माहिती ,बातमी असू शकते किंवा संवेदनशील माहिती असू शकते जि लोकाना दिशाभूल करू शकते.व ते आपणास महागात किंवा अडचणीत टाकू शकते.


३) आपल्या मित्रांकडून किंवा अनोळखी व्यक्तीकडून संदेश म्हणून आलेल्या लिंकवर क्लिक करताना सावधगिरी बाळगा.सोशल नेटवर्किंग वेबसाईटवरील पोस्ट ,इ मेल इत्यादी.यांना हायपर लिंक दिलेल्या असू शकतात.त्याना क्लिक केल्यास आपली वयक्तिक माहिती चोरीला जावू शकते.


४) अनोळखी व्यक्तीने पाठवलेली images किंवा व्हिडीओ डाउनलोड करू नका.सोशल मिडीया प्लाटफोर्मवर  किंवा वेबसाईटवरुन काहीही डाउनलोड करण्यापूर्वी नेहमीच माहिती साठवणाऱ्याची सत्यता तपासण्याचा प्रयत्न करा.फेसबुक वापरतांना दोन धोके हे staking ( पळत ठेवणे ) आणि सायबर -गुंडगिरी लक्षात ठेवा.stokarsnaa प्रतिबंध करण्यासाठी ,फेसबुक चे स्वता: लोकेशन सेट करणे अशा सेवा बंद करा.आणि आपल्या पोस्टवर आपले ठिकाण tag करण्यास टाळा.जेणेकरून आपल्यावर पळत ठेवणाऱ्याना त्याचा फायदा होणार नाही.


५) आपल्या सुट्ट्या,प्रवासाच्या योजना वगैरे सोशल मिडीयावर जाहीर करू नका.याचा वापर आपल्यावर पळत ठेवणारे संधी म्हणून करू नका.             क्रमश:---


                                                                                                                                                      प्रेमचंद राठोड 




Post a Comment

0 Comments